Pune, फेब्रुवारी 14 -- Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील हवामान यंदा जानेवारीच्या मध्यापासून बदलू लागले. दिवसा कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीमहिन्यातच एप्रिल-मे सारखा उष्णता जाणवत असल्याने गहू व इतर रब्बी पिकांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून दिवसा उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसू लागला आहे. दिवस व रात्रीच्या तापमानात १७ अंश सेल्सिअसपर्यंत चा फरक दिसून येत आहे. होळीनंतर पडणारी उष्णता फेब्रुवारीमहिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील तापमानात गुरुवारच्या तुलनेत १ अंशाची घट झाली आहे. पुण्यातील कमाल तापमान ३६अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके होते. पुण्यामध्ये...