Pune, मे 25 -- Maharashtra SSC Result 2024 Date : १२ वीचा निकाल लागल्यावर १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रतीक्षा होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बाबत काही दिवसांपूर्वी अपडेट दिली होती. त्यानुसार पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

बोर्डा कडून बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर १० वीच्या निकाला बाबत प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ २७ मे रोजी १० वीचा निकाल जाहीर करणार आहे. ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, ...