Mumbai, एप्रिल 19 -- गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरे कुटुंबात एकजूट होणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली ज्या प्रकारे संकेत दिले आहे, त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो, असं या दोघांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या पॉडकास्टचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यामध्ये त्यांच्याशी मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी संवाद साधला . मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची माझी तयारी आहे.

र...