Mumbai, मे 9 -- राजस्थानमधील मेवाडचे राजे महाराणा प्रताप सिंग यांची आज जयंती. राजपूत शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे, १५४० रोजी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात झाला. काही ठिकाणी त्यांचे जनस्थळ कुंभलगड असेही नमूद आहे.

महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समाजासोबत गेले व त्यांच्यासोबतच ते युद्धकला शिकले. वडिलांच्या मृत्युनंतर महाराणा प्रताप यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी मेवाडच्या राजघराण्याची गादी स्वीकारली. राजपदावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला.

एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून महाराणा प्रताप यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. राजस्थानमध्ये महाराणा प्रताप जयंती ही सार्वजनिक सुट्टी आहे. महाराणा प्रताप यांच्या सन्मानार्थ मिरवणुका आणि रॅली काढल...