Mumbai, फेब्रुवारी 2 -- महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेचा अंतिम सामना आज (२ फेब्रुवारी) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि ६७ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. पण यंदाही तो फायनलमध्ये पराभूत झाला.

गायकवाड आणि मोहोळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. यात मोहोळ याने बाजी मारली. मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि पृथ्वीराजला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली.

मोहोळच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान केला. तसेच त...