Mumbai, जानेवारी 28 -- Kumbh Melamnhvb Viral News: व्हायरल गर्ल मोनालिसानंतर महाकुंभातील आणखी एक तरुणी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या तरुणीने साध्वी बनण्यासाठी चक्क एअर होस्टेसची लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारली, असा दावा केला जात आहे. मनाला समाधान मिळेल, अशाच गोष्टी करायला पाहिजेत, असा सल्ला देखील या तरुणीने दिला.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या करण्यात आलेल्या व्हिडिओत संबंधित तरुणीला लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी का व्हायचे आहे असे विचारण्यात आले. यावर तरुणीने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती म्हणाली की, एअर होस्टेस होणे अनेक मुलींचे स्वप्न आहे. परंतु, मनाला धार्मिक गोष्टींमध्ये आनंद मिळत असेल तर, त्या दिशेने वाटचाल करायला हवी. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्...