Prayagraj, फेब्रुवारी 10 -- Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये रविवारी महाकुंभ मेळ्याच्या मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होते. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमल्याने स्टेशन बंद करण्यात आले. महाकुंभ प्रशासना द्वारे प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५१ कोटीहून अधिक भाविकांनी गंगा संगमात स्नान केले. १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.

प्रयागराज महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. गर्दीचा ताण इतका आहे की, संगमाकडे जाणारा प्रत्येक रस्ता जॅम झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रयागराज शहराकडे जाणारी वाहनेही रेंगाळत आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कों...