Mumbai, जानेवारी 30 -- Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत डझनाहून अधिक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. छतनाग घाट, नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळील टेंट सिटीमध्ये ही आग लागली. झुन्सी बाजूला छतनागजवळ जत्रेच्या काठावर हा घाट आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले असून अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महाकुंभाच्या सेक्टर २२ मध्ये चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी अचानक आग लागली. भाविकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेतली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. महाकुंभचा सेक्टर २२ हा परिसर झुंसीच्या छतनाग ...