भारत, जानेवारी 24 -- Maha Kumbh Third Snan 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पौष पौर्णिमेपासून (१३ जानेवारी २०२५) महाकुंभ सुरू झाला आहे आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. महाकुंभाचे पहिले शाही स्नान पौष पौर्णिमेला आणि दुसरे शाही स्नान मकर संक्रांतीला (१४ जानेवारी २०२५) झाले. आता महाकुंभाचे तिसरे शाही स्नान मौनी अमावास्येला होणार आहे. यावर्षी मौनी अमावस्या २९ जानेवारी २०२५ रोजी आहे.

महाकुंभ २०२५ शाही स्नान दिनांक-

पौष पौर्णिमा: १३ जानेवारी

मकर संक्रांत : १४ जानेवारी

मौनी अमावस्या : २९ जानेवारी

वसंत पंचमी: ०३ फेब्रुवारी

माघी पौर्णिमा: १२ फेब्रुवारी

महाशिवरात्री : २६ फेब्रुवारी

ब्रह्म मुहूर्त- सकाळी ०५ वाजून २५ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपर्यंत.

विजय मुहूर्त- दुपारी ०२ वाजून २२ मिनिटांपासून ते ०३ वाजून ०५ मिनिटा...