प्रयागराज, फेब्रुवारी 15 -- प्रयागराज येथे भरलेल्यामहाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषणआग लागली असूनयामध्ये अनेकछावण्या (टेंट) जळून खाक झाले आहेत.अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

महाकुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग लागल्याने भाविकांची पळापळ झाली. आगीचे वृत्त समजताच पोलिस-प्रशासनात एकच खळबळ उडाली. महाकुंभातील लवकुश धाम कॅम्पमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत अनेक तंबूही जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशी लागली? हे समजू श...