Mumbai, फेब्रुवारी 1 -- Ganesh Jayanti 2025: सनातन धर्मातील गणेशाला पहिले पूजनीय दैवत मानले जाते. विधीपूर्वक गणेशाची पूजा केल्याने साधकाचे सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे. मानसिक शांती प्राप्त होते आणि दु:खापासून मुक्ती मिळते. महाराष्ट्र आणि कोकणात माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा सण गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. इतर ठिकाणी भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. द्रृक पंचांगानुसार यावर्षी १ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. असे म्हटले जाते की, गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाची पूजा आणि मंत्रोच्चार केल्याने विशेष फळ मिळते. चला जाणून घेऊ या गणेश जयंतीचा शुभमुहूर्त, साहित्य यादी, पूज...