Mumbai, जानेवारी 28 -- Maghi Ganesh Jayanti: माघ शुद्ध चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला. हा दिवस गणेश जयंती किंवा माघ गणपती या नावाने साजरा केला जातो. भादप्रद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणपतीत देखील श्री गणेशाची पूजा केली जाते. गणपतीने तीन अवतार घेतल्याचे सांगितले गेले आहे. या तीन अवतारांचे तीन जन्मदिन साजरे करण्याची प्रथा आहे. त्यांपैकी एक म्हणजे माघी गणपती.

गणपतीने एकूण तीन अवतार घेतल्याचे मानले गेले आहे. गणपतीने पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घेतला. हा दिवस पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो. तर, दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला गेला. या दिवसाला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा केला जातो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला घेतला. हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो....