Mumbai, फेब्रुवारी 11 -- Magh Purnima 2025 In Marathi : हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमा यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. माघ पौर्णिमेचा दिवस स्नान आणि दान कार्यासाठी खास असतो. या दिवशी देवी लक्ष्मी, नारायण आणि चंद्र देव यांची पूजा केली जाते. यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान ही केली जातात.

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवार १२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी संपेल. म्हणून उदया तिथीनुसार बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ ला माघ पौर्णिमा आहे.

धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख-समृ...