Mumbai, फेब्रुवारी 5 -- February Magh Purnima 2025 In Marathi : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला पौर्णिमा असते. फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमा व्रत पाळण्यात येईल. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माघ महिन्यातील प्रत्येक दिवस दानासाठी विशेष मानला जातो. परंतु माघ पौर्णिमेचा दिवस हा स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमा कधी आहे, स्नान आणि दान करण्याची शुभ वेळ आणि महत्त्व.

पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू हो...