Mumbai, फेब्रुवारी 10 -- Magh Paurnima in Buddhism: बौद्ध धर्मात माघ पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण मानला गेला आहे. उत्तर प्रदेशातील वैशाली या प्रसिद्ध नगरीत तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. म्हणून या पौर्णिमेस स्मरणदिन असेही म्हणतात. माघ पौर्णिमा बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आहे.

बौद्ध धर्मात इतर सर्व पौर्णिमांप्रमाणे माघ पौर्णिमेचेही विशेष असे महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांनी वैशाली या नगरीत आपला ४५ वा वर्षावास केला होता. त्याच दिवशी त्यांनी स्वत: आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. त्यामुळ माघ पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणण्याची प्रथा आहे.

या दिवशी बौद्ध धर्मीय मोठ्या श्रद्धेने त्रिरसण आणि अष्टशीलाचे पालन करतात. या दिवशी सर्व लहानथोर मंडळी एकत्र जमून वंदना कर...