Mumbai, जानेवारी 30 -- Magh Month 2025 In Marathi : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष स्वतःचे महत्त्व असते. काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात लोक गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वार, प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळी जातात. धार्मिक दृष्टिकोनातून गंगेत स्नान करणारी व्यक्ती शरीर आणि आत्म्याने पवित्र बनते असा समज आहे. ३० जानेवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा माघ महिना चालणार आहे.

हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. या महिन्यातील पौ...