Mumbai, जानेवारी 28 -- Magh Gupt Navratri 2025 Shubh Muhurta : हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ गुप्त नवरात्र ३० जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. याचा समारोप ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. वर्षभरात एकूण चार नवरात्र होतात. ज्यात २ गुप्त नवरात्रीचा समावेश आहे. नवरात्रात भगवती देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीत दहा महाविद्यांचे पूजन केले जाते.

या दहा महाविद्यांची नावे आहेत- काली, तारा (देवी), छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी (त्रिपुर सुंदरी), धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. नवरात्रात प्रतिपदा तिथीपासून व्रत सुरू करण्याबरोबरच शुभ मुहूर्तात कलश स्थापन करण्याचाही नियम आहे. जाणून घेऊया माघ गुप्त नवरात्रीची नेमकी तिथी, कलश स्थापना मुहूर्त आणि कलश स्थापित करण्याची पद्धत.

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प...