भारत, सप्टेंबर 22 -- बॉलिवूडची 'धकधक' गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी माधुरीची 'फेम गेम' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता तिचा 'मजा मा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मजा मा या चित्रपटाच्या २ मिनिटे ५१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये माधुरी पल्लवीच्या भूमिकेत दिसते. तिच्या संपूर्ण आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. पल्लवी ही तिच्या मध्यमवर्गीय घराचा व ती राहत असलेल्या सोसायटीचा कणा आहे, फिल्मची कथा तिच्याभवतीच फिरणारी आहे. जसजशी घटनांची मालिका उलगडू लागते, पल्लवीने प्रेमाने उभे केलेले सगळे काही कोसळी लागते आणि त्यामुळे तिच्या मुलाचा होऊ घातलेला साखरपु...