भारत, जानेवारी 30 -- बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामधील एक सिनेमा म्हणजे 'हम साथ साथ हैं.' हा चित्रपट १९९९मध्ये प्रदर्शित झाला होता. ९०च्या दशकात हा सिनेमा तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात सलमानसोबत अनेक बडे स्टार्स दिसले होते. सलमान खान, मोहनीश बहल, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे यांसारखे कलाकार दिसले. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी चित्रपटाच्या कास्टिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, माधुरीला या चित्रपटात काम करायचे होते. पण काही कारणास्तव घेता आले नाही.

सूरज बडजात्याने रेडिओ नशाशी खास बातचीत केली. या मुलाखतीमध्ये सूरज बडजात्याला विचारण्यात आले की, तब्बूला चित्रपटात कास्ट करण्यापूर्वी त्याने माधुरी दीक्षितसह ...