Mumbai, फेब्रुवारी 19 -- Lunar Eclipse: वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होणार आहे. हे चंद्रग्रहण १३-१४ मार्च २०२५ रोजी होणार आहे. हे ग्रहण रेड ब्लड मून असेल. नासाच्या वेबसाईटनुसार, चंद्रग्रहण १३ मार्चच्या रात्री आणि १४ मार्चच्या पहाटे जगातील काही भागात दिसेल. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सिंह आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. जाणून घ्या, मार्च महिन्यातील चंद्रग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसेल, वेळ आणि सूतक काळ भारतात मान्य असेल की नाही?

भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि १० वाजून ३९ मिनिटांनी ते संपेल. तसेच हे चंद्रग्रहण ११ वाजून ५६ मिनिटांनी संपेल.

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात न दिसल्याने या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देशात मान...