Mumbai, एप्रिल 27 -- आज, शनिवार, २७ एप्रिल संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. हा योग ५ राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. त्या ५ राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

वृषभ: आज योग चांगले आहेत. तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी...