Mumbai, मे 23 -- आज सर्वत्र बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे. परंतु अनेकांना ज्ञात नसेल की, वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. कारण आजच्याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे शास्त्रात या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त आहे. आजच्या या शुभ दिवसाचा प्रभाव राशींवरसुद्धा दिसून येत आहे. आज गुरुवारच्या दिवशी कोणत्या पाच राशी नशीबवान ठरल्या आहेत ते आपण राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुणांना मनासारखा जोडीदार मिळेल. नोकरीच्या कामामध्ये येत असलेल्या शंकाचे निरसन झाल्याने प्रगतीचा वेग वाढेल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग जुळून येईल. यामध्येसुद्धा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कामे वेळेत पूर्ण होतील मात्र पैसे मिळण्यात थोडा धीर धरावा लागेल. घरामध्ये मह...