Mumbai, मे 2 -- आज गुरुवार २ मे रोजी, मकर राशीनंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून, या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना दिवस फायदेशीर ठरेल.

आजच्या दिवशी चंद्र आणि गुरु संयोग करत आहेत. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. परकीय देशातील व्यवसाय तसेच नोकरी संदर्भातील रखडलेली कामे मार्गी लागतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक घडामोडी घडतील. तुमच्याकडून मोठी खरेदी होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

Panc...