Mumbai, एप्रिल 23 -- आज मंगळवार २३ एप्रिल रोजी, कन्या राशीनंतर चंद्र तूळ राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या तारखेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म माता अंजनीच्या पोटातून झाला होता. हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्धी योग, त्रिग्रही योग आणि चित्रा नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींच्या लोकांना भाग्याची उत्तम साथ मिळेल, बजरंगबली सर्व संकटे दूर करतील.

आज दिवस उत्तम आहे. आर्थिक आवक चांगली राहील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत यशस्वी व्हाल. कामाचे कौतुक ...