Mumbai, मे 6 -- आज सोमवार ६ मे रोजी, मीन राशीनंतर चंद्र मेष राशीत जाणार आहे. तसेच चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी असून या तिथीला मासिक शिवरात्रीचे व्रत पाळण्यात येणार आहे. तसेच आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आजच्या शुभ दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग आणि रेवती नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशीच्या लोकांना आज शुभाशिर्वाद मिळतील आणि दिवस लाभदायक राहील.

मिथुन राशीसाठी आज आठवड्याचा पहिला दिवस अतिशय चांगला असणार आहे.तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक सलोखा राहील. तसेच ओळखीच्या लोकांमध्ये मानसन्मान वाढेल. मित्रपरिवारासोबत कुशीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रकृती एकदम उत्तम राहील. त्यामुळे कामात उत्...