Mumbai, फेब्रुवारी 6 -- Lucky Horoscope in Marathi: गुरुवार, दिनांक ०६ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची अष्टमी ही तिथी आहे. आज कृतिका नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र वृषभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०६ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर.

मेष राशीच्या लोकांसाठी ६ फेब्रुवारीचा दिवस खूप शुभ राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा दिवस खूप चांगला जाईल. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंद घेऊन येईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे घरात आनंद आणि शांती राहील. पैशांशी संबंध...