Mumbai, फेब्रुवारी 2 -- Lucky Horoscope in Marathi: रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची चतुर्थी ही तिथी आहे. आज उत्तर भाद्रपद नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र मीन राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०२ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर.

२ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत देखील आहेत, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या कारकिर्दीत प्रगती होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल, तर ती पुढे नेण्यासाठी हा एक उत्तम काळ असेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस यश आणि प्रगती घ...