भारत, फेब्रुवारी 28 -- Lucky Horoscope in Marathi: शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात फाल्गुन मासाची शुक्ल पक्षाची प्रथमा ही तिथी आहे. आज शतभिषा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र कुंभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २८ फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ, धनु.

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरेल. व्यवसायात नुकसान सहन करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि इच्छित यश मिळेल. तुम्ही ज्या यशाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते आता मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ समाधानाचा असेल. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांसाठीही चांगला काळ सुरू होईल. याशिवाय, तुम्हाला आरोग...