Mumbai, फेब्रुवारी 15 -- Lucky Horoscope in Marathi: शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची तृतीया ही तिथी आहे. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र कन्या राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १५ जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, कर्क, वृश्चिक, मकर, मीन.

१५ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. हा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यतांनी भरलेला असेल. या दिवशी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या कारकिर्दीत मोठी संधी मिळू शकते. जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक लाभ घेऊन य...