Mumbai, जानेवारी 29 -- Lucky Horoscope in Marathi: बुधवार, दिनांक २९ जानेवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची अमावस्या ही तिथी आहे. आज उत्तराषाढा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र मकर राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २९ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन.

मेष राशीच्या लोकांसाठी २९ जानेवारी हा दिवस खूप चांगला असेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. परस्पर मतभेद दूर होतील. प्रियकर आणि प्रेयसीमधील नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासू व्हाल. समाजात एक नवीन ओळख निर्माण होईल. लोकांमध्ये आदर आणि सन्मान वाढेल. कामात नफा होऊ शकतो.

२९ जानेवारी हा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी ख...