Mumbai, फेब्रुवारी 23 -- Lucky Horoscope in Marathi: रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची दशमी ही तिथी आहे. आज मूळ नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २३ फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ, मकर.

२३ फेब्रुवारीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. कुटुंबात एखादी चांगली बातमी येऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर आजचा दिवस चांगला जाईल.

२३ फेब्रुवारी हा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल. आज जुन्या गुंतवणुकीतून त...