Mumbai, फेब्रुवारी 22 -- Lucky Horoscope in Marathi: शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची नवमी ही तिथी आहे. आज ज्येष्ठ नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २२ फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, कन्या, धनु, मीन.

२२ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात असलेल्या मेष राशीच्या जातकांसाठी आजचा हा दिवस प्रगती घेऊन येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल. या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आजचा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी नवीन संधी देखील घेऊन येऊ शकतो.

वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा हा दिवस आर्थिकदृष...