Mumbai, एप्रिल 2 -- आयपीएल २०२४ मध्ये मंगळवारी (१ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने १७१ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पंजाबने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला. पंजाब किंग्जचा हंगामातील हा दुसरा पराभव आहे.

सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका हे ऋषभ पंतसोबत मैदानात संवाद साधताना दिसले. यावेळी गोयंका निराश असल्याचे दिसत होते. ड्रेसिंग रूमचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गोयंका पंतला हात दाखवत काहीतरी बोलत आहेत आणि पंत खाली मान घालून ऐकत आहे.

विशेष म्हणजे, ऋषभ पंत याचा फॉर्म लखनौ सुपर जायंट्ससाठी चिंतेची बाब आहे. पंजाब किंग्जविरुद्ध तो केवळ २ धावा करून बाद झाला. पहिल्या सामन्यातही १५ धावा करणाऱ्या प...