Mumbai, मे 4 -- जोतिषशास्त्रात लव लाईफबाबतदेखील अंदाज दर्शविले जातात. ग्रह-नक्षत्रांच्या बदलाचा परिणाम तुमच्या लव लाईफवरसुद्धा होतो. त्यामुळे अनेकजण लव लाईफमध्ये संतुलन ठेवण्यासाठी जोतिषशास्त्राचा आधार घेतात. आज शनिवार ४ मे वरुथिनी एकादशी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. याचा सकारत्मक परिणाम तुमच्या लव लाईफवरसुद्धा होणार असल्याचे शास्त्र सांगते. आज सायंकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत चंद्र कुंभ राशीत असेल. परंतु त्यांनंतर चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. या भ्रमणाने शुभ योग तयार होत आहे. पाहूया या शुभ योगमुळे कोणत्या राशींची लव लाईफ सुधारणार आहे.

आजच्या त्रिपुष्कर शुभ योगचा मेष राशीसाठी चांगला फायदा होईल. प्रेमीवीरांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आणि आनंददायी असणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. मैत्रीपूर्ण, प्र...