भारत, मे 3 -- Sanjay Nirupam Quits Congress: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहत असताना काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. संजय निरुपम यांनी पत्नी आणि मुलीसह एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला.

सामनाच्या हिंदी वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना दिलेल्या संधीमुळे शिवसेनेत राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या निरुपम यांच्यासाठी ही घरवापसी आहे. शिवसनेत असताना मतभेद झाल्यानंतर निरुपम यांनी २००५ मध्ये पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना निरुपम म्हणाले की, "मी आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...