Mumbai, फेब्रुवारी 24 -- Arvind Sawant Vs Rahul Narwekar : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असल्यामुळं आता प्रमुख राजकीय पक्षांचे पत्ते उघड होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं महायुतीपुढं आव्हान असेल. त्यामुळंच सर्व बाजूंचा विचार करून बलाढ्य उमेदवार ठरवले जात आहेत. दक्षिण मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला टक्कर देण्यासाठी भाजपनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं निश्चित केल्याचं समजतं.

आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकायच्या असा निर्धार भाजपनं केला आहे. हे लक्ष्य गाठायचं असेल तर उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे. मात्र, इथं महाविकास आघाडीकडून महायुतीला जोरदार टक्कर मिळणार आहे. विशेषत: पक्ष फुटल्यामुळं दुखावलेली ठाकरेंची शिव...