Mumbai, ऑक्टोबर 7 -- LDLC Level in Marathi: हृदयाचं आरोग्य जपायचं तर फक्त आहार आणि व्यायाम इतकंच सांभाळणं पुरेसं नसतं. त्यासाठी आपल्या आरोग्याचे, विशेषत: एलडीएलसी म्हणजे बॅड कोलेस्ट्रोलचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)च्या मते एलडीएलसीची वाढलेली पातळी हा जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या हृदयविकारास कारणीभूत ठरणारा आघाडीचा घटक आहे

कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट करणं गरजेचं असून अनेकांना याबाबत माहिती नसल्याचं समोर आलं आहे. यावेळी जवळपास ३०-४० टक्‍के रुग्णांना त्यांच्या एलडीएलसीच्या पातळी विषयी कोणतीही माहिती नसते, असे फोर्टिस हॉस्पिटल मुंबईच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान सांगतात. याशिवाय आपल्यासाठी एलडीएलसीचं प्रमाण काय असलं पाहिजे याबाबत तर त्याहूनही थोड्या लोकांना माहिती आहे, असं निदर्शनास आलं आहे. ...