Mumbai, जानेवारी 31 -- Do you Know: स्वीडनमधील मशिदीसमोर इस्लामी ग्रंथ कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सलवान मोमिकाने २०२३ मध्ये कुराणच्या अनेक प्रती जाळल्या होत्या.सलवानच्या अशा कृत्यामुळे अनेक मुस्लीम राष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सलवानचा मृतदेह बुधवारी रात्री उशीरा त्याच्या राहत्या घरात आढळून आला. या घटनेनंतर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर भारतात एखाद्या व्यक्तीने कोणत्याही धर्माचे ग्रंथ जाळले किंवा त्याचा अपमान केला तर, त्याला कोणती शिक्षा दिली जाईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मोमिका हा इस्माल धर्मविरोधी होता. त्याने २०२३ मध्ये ईदच्या निमित्ताने स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर कुराणचा अपमान करून जाळून टाकले. त्याच्या अशा कृत्यामुळे...