Mumbai, फेब्रुवारी 11 -- Lata Mangeshkar Life Kissa : 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर आणि आशा भोसले ही भारतीय संगीत सृष्टीतील अशी दोन नावे आहेत, ज्यांनी बॉलिवूडला खूप काही दिले आहे. या दोन्ही बहिणी व्यावसायिक आघाडीवर जितक्या समर्पित आणि सक्रीय होत्या, तितक्याच त्यांचे परस्पर संबंध घट्ट होते. आशा भोसले यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, या दोन्ही बहिणी (आशा आणि लता) बहुतेकवेळा केवळ पांढऱ्या रंगाच्या साड्याच का परिधान करायच्या. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्या आउटफिट्ससाठी इतर रंग ट्राय केले नाहीत असे नाही, तर पांढरे कपडे घालण्यामागे त्यांचे एक कारण होते, जे त्यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्याशी बोलताना सांगितले.

याबद्दल बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, 'दीदी (लता मंगेशकर) आणि मी नेहमी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान कर...