Mumbai, जानेवारी 11 -- Lal Bahadur Shastri Pakistan story in Marathi: आजच्या दिवशीच म्हणजेच ११ जानेवारी १९६६ रोजी, ५९ वर्षांपूर्वी,भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे रहस्यमय परिस्थितीत निधन झाले होते. हा मृत्यू सामान्य मृत्यू नव्हता, ज्याचे गूढ आजही उलगडलेले नाही. केवळ १९ महिने देशाचे पंतप्रधान राहिलेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या कमी उंचीची खिल्ली उडवण्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली होती आणि १९६५ मध्ये जेव्हा युद्ध झाले तेव्हा भारतीय सैन्य लाहोर शहराच्या अगदी जवळ पोहोचले होते.

पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल अयुब खान कोणत्याही नेत्याचे त्याच्या उंचीवरून मूल्यांकन करायचे. लाल बहादूर शास्त्रींची उंची ५ फूट २ इंच आणि ...