Pune, फेब्रुवारी 4 -- Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणास लवकरच सुरूवयात होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार असून जर लाभार्थ्यांच्या घरात चारचाकी वाहन आढळले तर लाडकी बहीण योजनेतून त्यांचे नाव रद्द केले जाणार आहे. एवढेच नाही तर पती किंवा इतर कुटुंबियांकडे जरी कार आढळली तर त्यांचे नाव हे बाद केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत या सूचना दिल्या आहेत.

राज्यात तब्बल अडीच कोटींपेक्षा ...