Mumbai, फेब्रुवारी 7 -- Ladki Bahin Yojana: राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र यातील लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. अशा अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत असून केवळ पुण्यातून जवळपास ७५ हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आला आहे.

ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केली आहे. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते,या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर योजनेतून नाव मागे घेण्यासाठी तसेच आधी घेतलेले लाभ पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे.

हे ही ...