Pune, फेब्रुवारी 10 -- Ladaki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या पडताळणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी आहे, अशांना या योजनेच्या यादीतून वगळले जाणार आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या 'बहिणीं'ची यादी आली असून तब्बल ७५ हजार १०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दीनुसार आता अंगणवाडी सेविका 'बहिणीं'च्या घरी जाऊन पडताळणी करणार असून त्यांच्याकडे कार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांची नावे योजनेतून रद्द केली जाणार आहेत.

महायुती सरकारला ज्या लाडक्या बहिणींनी सत्ता मिळवून दिली आहे, त्या योजनेची पडताळणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. आता पर्यंत सरकारने ५ लाख बहिणींची नावे या योजनेतून व...