प्रयागराज, जानेवारी 30 -- Kumbh Stampede : महाकुंभातील दुसरा आणि सर्वात मोठा उत्सव मौनी अमावस्येनिमित्त मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास संगम नोज येथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ९० भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३० जणांचा मृत्यू झाला. यातील २५ जणांची ओळख पटली आहे, तर पाच जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. डीआयजी वैभव कृष्णा आणि मेल ऑफिसर विजय किरण आनंद यांनी बुधवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची पाच प्रमुख कारणं समोर आली आहेत.

महाकुंभाच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत दररोज सर्वसामान्य माघ मेळ्यांच्या मकरसंक्रांत किंवा वसंत पंचमीसारखे वातावरण होते. या महाकुंभात अमृतस्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजला येणार हे जवळपास निश्चित होते. प्रशासनानेच ८ ते...