Prayagraj, जानेवारी 29 -- Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्या दरम्यान, पहाटे १ वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. घाटावर अचानक मोठी गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. अपघातात जखमी झालेल्या अनेकांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून आखाडा परिषदेने अमृत स्नान पुढे ढकलले आहे.

महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आखाड्यांचे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यातील साधू-संत शाही स्नान करत असतात. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी आखाड्यांना पहा...