भारत, फेब्रुवारी 2 -- उत्तर प्रदेशातील प्रयागगराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात देशभरातील कोट्यवधी यात्रेकरू सहभागी झाले आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा चालणार आहे. दरम्यान, कुंभमेळ्यात विविध स्वयंसेवी संस्थांसोबतच अनेक उद्योगसमूहांनी देखील यात्रेकरूंच्या मदतीसाठी हात पुढे केले आहे. देशातली बलाढ्य कंपनी असलेल्या रिलायन्सतर्फे कुंभमेळ्यात यात्रेकरूंसाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रिलायन्स उद्योगसमूहातर्फे प्रयागराजमध्ये 'तीर्थ यात्री सेवा' नावाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याद्वारे कुंभमेळ्यातील यात्रेकरूंसाठी पौष्टिक आहार, अत्यावश्यक आरोग्यसेवा, सुरक्षित वाहतूक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सारख्या सेवा पुरवल्या जात आहे.

हे वाचाः ममता कुलकर्णी हिची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी

कुभमेळ्यात 'तीर्थ यात्री सेवा' प्रकल्प राबवण्यासाठी र...