भारत, जानेवारी 26 -- Krushna Abhishek: कॉमेडियन-अभिनेता कृष्णा अभिषेक नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याला शूजची प्रचंड आवड आहे. नुकताच कृष्णा अभिषेकने ते ठेवण्यासाठी वेगळा फ्लॅट खरेदी केला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'पासून 'बिग बॉस' आणि 'लाफ्टर शेफ'पर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कृष्णा अभिषेकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याने राहण्यासाठी नाही तर शूज आणि कपडे ठेवण्यासाठी थ्री बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. तो या फ्लॅटचा वापर स्टोअर हाऊस म्हणून करतो. इतकंच नाही तर कृष्णा दर 6 महिन्यांनी आपल्या शूज आणि कपड्यांचे हे कलेक्शन अपडेट करतो.

कृष्णा नुकताच अर्चना पूरण सिंहच्या यूट्यूब चॅनेलवर दिसला जिथे 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या परीक्षक अर्चनाने त्याला दुपारचे जेवण दिले. यावेळी क...