Mumbai, नोव्हेंबर 29 -- मुंबई : भाजपची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या एकमेव माजी आमदाराने उद्धव ठाकरे गटाला राम राम केला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी त्यांच्या समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. हेगडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत त्यांचा गटात प्रवेश केला. यावेळी त्यांची बाळसाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

भाजपमधून बाहेर पडत कृष्णा हेगडे यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचा प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हेगडे यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

विले पार्ले हा...