भारत, मार्च 6 -- मुंबईत आजपासून ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरूवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात येणार आहे. मुंबईत गोरेगावच्या नेस्को ग्राउंड येथे ६ ते ९ मार्चदरम्यान हा भव्य सोहळा रंगणार आहे. कोकणचा विकास म्हणजे फक्त मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर येथील संस्कृती, माणसं आणि निसर्ग जपत पुढे जाण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कोकण भूमी प्रतिष्ठानने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असतील तर अध्यक्षपदी उद्योग मंत्री उदय सामंत असतील. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, वनमंत्री गणेश नाईक आणि खाण मंत्री शंभुराज देसाई उपस्थित असणार आहे.

यंदा ग्लोबल कोकणचे ११वे वर्ष आहे. या निमित्ताने कोकणवासीयांसाठी माहितीपूर्ण सत्रं, उद्योजका...