Kolhapur, फेब्रुवारी 5 -- कोल्हापूरजिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या शिवनाकवाडी या गावात महाप्रसादाची खीर खाल्ल्याने जवळपास ३०० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना इचलकरंजीतील व शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावचे ग्रामदैवत कल्याणताई माता देवीची सोमवारी यात्रा होती. या यात्रेसाठी महाप्रसाद बनवला होता. या महाप्रसादाच्या खिरीतून भाविकांना विषबाधा झाली.विषबाधा झालेल्या २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच १००० हून अधिक जणांची तपासणी करून प्राथमिक उपचार देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.

५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिवनाकवाडी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षणकेले. त्यामुळे परिस्थितीबुधवारदुपारपासून आटोक्...